बेल्स पाल्सी | Bell’s palsy in Marathi

बेल्स पाल्सी हा एक असा रोग आहे. ज्यामध्ये चेहऱ्याच्या एका बाजूचे स्नायू कमकुवत होतात किंवा एका बाजूला पक्षाघात होतो. जर या स्नायू पर्यंत जाणाऱ्यां नसा खराब झाल्यानंतर ही समस्या येते परंतु, या स्नायूवर तात्पुरता परिणाम होतो आणि उपचार केल्यावर ते पूर्णपणे बरे होतात.

बेल्स पाल्सी होण्याची कारणे कोणती आहेत?

बेस्ट पालखीची नेमकी कारणे माहीत नाहीत.

परंतु असे म्हटले जाते की अशा अनेक व्हायरल इन्फेक्शन आहेत.

 यामुळे हा रोग होतो जसे की हर्पिस सिंपलेक्स, हरपिक झोस्टर, एच आय व्ही, सायटोमेगालो व्हायरस आणि एपस्टाईन बार व्हायरस.

बेल्स पाल्सी या रोगाचे काही रिस्क फॅक्टर आहेत ते खालील प्रमाणे:

  • मधुमेह.
  • गर्भावस्था विशेषतः शेवटचे तीन महिने.
  • जर कुटुंबात हा रोग आधी कोणाला झाला असेल तर.
  • चेहऱ्याच्या नसांना झालेली कुठलीही दुखापत, सूज, किंवा नुकसान यामुळे सुद्धा बेल्स पाल्सी होऊ शकतो.

बेल्स पाल्सी हा रोग कसा पसरतो?

विषाणूजन्य संसर्गामुळे फेशियल  नर्व्हला सूज येते. त्या हाडांमध्ये ती दबली जाते. या दबावामुळे फेशियल नर्व्हचे कार्य थांबते. तसेच हरपीस सिंपलेक्स, मधुमेह, उच्च रक्तदाब, यामुळेदेखील बेल्स  पाल्सी हा रोग होऊ शकतो / पसरतो.

बेल्स पाल्सी या रोगाचा उष्मायन अवधी किती असतो?

बेल्स पाल्सी या रोगाचा उष्मायन अवधी 48 तासांचा असतो.

बेल्स पाल्सी या रोगामध्ये कोणते अवयव बाधित होतात?

सातवी क्रेनियल नर्व्ह दबली जाते. तसेच डोळे आणि तोंड हे अवयव बाधित होतात.

बेल्स पाल्सी या रोगाची लक्षणे कोणती आहे?

बेल्स पाल्सी मुळे चेहऱ्याच्या एका बाजूच्या स्नायूवरच परिणाम होतो. सुमारे एक टक्के लोकांमध्ये दोन्ही बाजू वर परिणाम होतो.

  • चेहऱ्याच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या नसांवर परिणाम होतो. रुग्णांना डोळे मिचकावण्यास.  ज्या बाजूवर परिणाम झाला आहे  त्या बाजूने तोंड उघडण्यास, हसण्यास,आणि चावण्यास त्रास होतो.
  • चेहऱ्याच्या ज्या बाजूवर परिणाम झाला आहे तिथे दुखू शकते. मुख्यता जबडा आणि डोक्यामध्ये.
  • स्नायू अशक्त झाल्यामुळे डोळ्याच्या पापण्या खाली झोपतात आणि तोंडातून लाळ गळते.
  • जिभेच्या पुढील भागाने चव ओळखता येत नाही.

बेल्स पाल्सी या रोगाचे निदान कसे केले जाते?

याचे निदान शारीरिक तपासणी इमेजिंग आणि ब्लड टेस्ट द्वारे केले जातात.

  • रोगाची लक्षणे बघून डॉक्टर चेहरा तपासतात आणि डोळ्याच्या पापण्या झुकले आहेत का, तोंडातून लाळ गळते आहे का, हे बघतात.
  • एम आर आय आणि सिटीस्कॅन सारख्या इमेजिंग तंत्राच्या साह्याने चेहऱ्याचे स्नायू तपासले जातात.
  • जर व्हायरल इन्फेक्शन असल्यासारखे वाटत असेल तर डॉक्टर ब्लड टेस्ट करायला सांगतात.
  • हाऊस ब्रेकमन स्कोर:

तंत्रिका क्षतिग्रस्त अवस्थेचे मूल्यांकन करणे.

  • इलेक्ट्रॉमॅगोग्राफी:

चेहऱ्यावरील तंत्राचा त्रास तपासण्यासाठी.

  • स्ट्रोक, लाईम रोग आणि ब्रेन ट्यूमर यासारखे इतर रोग वगळून निदान करण्यात येते.

बेल्स पाल्सी या रोगावर उपचार कसे केले जातात?

बेल्स पाल्सी उपचार हे रोगाची कारणे आणि रिस्क फॅक्टरस वर खूप अवलंबून असतात.

  • कॉर्तिकॉस्टरोईड हे सामान्यता दिल्या जाणाऱ्या औषधांपैकी एक आहे. त्यामुळे सहा महिने आराम मिळतो,

पण सुरुवातीलाच स्टेरॉइड्स ने उपचार सुरु करणे महत्त्वाचे असते.

  • जर व्हायरसमुळे हा रोग झाला असेल तर अँटिव्हायरल औषधे दिली जाऊ शकतात.
  • औषधांबरोबर फिजिओथेरपीच्या मदतीने स्नायूंचा व्यायाम देखील करावा लागतो.
  • काही गंभीर केसेस मध्ये जर नस दबली असेल किंवा दुखापत झाली असेल तर,

 सर्जरी करून दबाव कमी केला जाऊ शकतो.

  • रिलॅक्झेशन थेरेपी:

ध्यान आणि योग मांसपेशी तनाव आणि तीव्र वेदना कमी करू शकतात.

  • ॲक्युपंचर:

तंत्रिका आणि स्नायूंना उत्तेजित करतात.

  • बायोफीडबॅक प्रशिक्षण:

चेहऱ्यावरील  स्नायुवर नियंत्रण ठेवण्यास आपल्याला शिकवले जाते.

  • विटामिन थेरेपी:

 तंत्रिका वाढीस मदत करते.

  • हा रोग काही  महिन्यातच बरा होतो आणि शक्यतोवर परत होत नाही.

(टीप: बेल्स पाल्सी ची लक्षणे रुग्णांमध्ये दिसून आल्यास ताबडतोब (म्हणजे तीन तासाच्या आत ) डॉक्टरांचा (न्यूरोलॉजिस्ट) सल्ला घेऊन योग्य ते उपचार सुरू करणे गरजेचे असते).




Leave a Reply