सध्या मिडीयाद्वारे आणि इंटरनेटवर चिया बिया (Chia seeds) या बियांवर भरपूर चर्चा केली जात आहे. चिया बिया आपल्या देशात किंवा महाराष्ट्रात पिकवल्या जात नाहीत. त्या मुख्यत्वेकरून मेक्सिको या देशात पिकवल्या जातात. त्या भारतात आयात केल्या जातात. सध्या जागतिकीकरणामुळे भरपूर कंपन्या या बिया भारतात मागवून पोषक अन्न म्हणून विकत आहेत. या बियांचे खरोखर काही आरोग्यासाठी फायदे आहेत का ते आपण येथे चर्चा करूया. विविध कंपन्यांद्वारे केलेल्या दाव्या मध्ये किती खरे आहे याची आपण येथे चर्चा करू या.
भारतीय संस्कृती प्रमाणे माया संस्कृती ही हजारो वर्षांपूर्वी अमेरिका खंडात अस्तित्वात होती. माया संस्कृतीच्या मानवी इतिहासात महत्त्वाच्या अशा अनेक देणग्या आहेत. त्यापैकीच एक देणगी म्हणजे चीया बिया. माया संस्कृती प्रचलित असलेल्या भाषे मध्ये चिया म्हणजे ताकत. माया संस्कृती या बियांची वर्णन ताकद देणाऱ्या बिया असे केले आहे. माया संस्कृती चिया हे महत्त्वाचे खाद्यान्न होते. हे पीक मेक्सिको या देशात निसर्गतः उत्पन्न होते.
चिया बिया कशा दिसतात?
चिया बियाणे दिसायला पांढऱ्या राखाडी रंगाच्या दिसतात. त्यांचा आकार वर्तुळाकार किंवा अंड्या सारखा असतो. या बिया दोन ते तीन मिलिमीटर लांबीच्या असतात. या बिया किराणा दुकानावर किंवा ऑनलाइन नीट पॅकिंग करून विकले जातात.
चिया बियांमध्ये कोणते पोषक तत्व असतात?
चीया बियांमध्ये विविध पोषकतत्वे असतात. जिया बी एन मध्ये कोणती पोषक तत्त्वे असतात हे जाणून घेण्यासाठी आम्ही यु एस डी ए च्या डेटा सेंटर मधील माहितीचा आढावा घेतला. या माहितीनुसार या बियांमध्ये खालील पोषकतत्वे असतात.
खालील टेबल मध्ये दिलेल्या माहिती वर एक नजर टाका. नंतर आपण यापैकी एक एक पोषक तत्वांचे महत्त्व जाणून घेऊया.
कॅलरी | ४८६ किलो कॅलरी | |
फॅट | ३१ ग्राम | ४७ % |
सोडियम | १६ मिली ग्राम | ० % |
पोटॅशियम | ४०७ मिली ग्राम | ११ % |
कर्बोदके | ४२ ग्राम | १४ % |
अन्नगट तंतु | ३४ ग्रॅम | १३६ % |
लोह | ४२ % | |
मॅग्नेशियम | ८३ % | |
कॅल्शियम | ६३ % | |
प्रोटीन्स | १७ ग्रॅम | ३४ % |
तुम्ही वरील तक्ता तक्ता नीट पाहिल्यास तुम्हाला असे दिसून येईल की या बियांमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज कर्बोदके, प्रथिने, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह असते. तसेच या बियांमध्ये फॅट म्हणजे तेलही असते. महत्त्वाचे म्हणजे या बियांमध्ये अन्नगत तंतू असतात. अन्नगत तंतु यांना आपण इंग्रजी डाएटरी फायबर असे म्हणतो.
कॅलरी
माया संस्कृतीत या बियांचा वापर एक अन्न म्हणून केला जात होता. या बियांमध्ये दर 100 ग्राम वजनाला साडेचारशे च्या आसपास कॅलरी असतात. आपण आपले रोजचे अन्न म्हणजे गहू आणि तांदूळ बघितल्यास त्यात तर 100 ग्रॅम ला अडीशे ते साडेतीनशे कॅलरीज असतात. म्हणजे या बियान मधून मिळणाऱ्या कॅलरीचे प्रमाण आपल्या नेहमीच्या अन्नातून मिळणाऱ्या कॅलरीज पेक्षा जास्त आहे. परंतु या अन्नात अन्नगत तंतू फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या कॅलरीचे रक्तात शोषण हळूवार केले जाते. यातील कॅलरीज कर्बोदके, प्रथिने आणि फॅट या तिघांनी मिळून येतात.
प्रथिने (proteins):
आपल्या स्नायूंची आणि शरीराची वाढ होण्यासाठी आपल्याला अन्नातील प्रथिनांची गरज असते. प्रथिने म्हणजे शरीराच्या बांधणीसाठी वापरण्यात येणारा एक मूलभूत घटक आहे. या बियांमध्ये १०० ग्रॅम मध्ये १७ ग्रॅम प्रथिने असतात. आपल्याला साधारणतः दिवसाला आपल्या शरीराचे वजन ६० किलो असल्यास आपल्याला ६० ग्रॅम प्रथिनांची गरज असते. लहान बाळांमध्ये त्यांच्या वजनाच्या दोन पट प्रथिने ग्रहांमध्ये दिवसाची लागतात. तसेच प्रेग्नंट महिलांना प्रथिनांची जास्त गरज असते. प्रथिनांच्या कमतरतेमुळे शरीराची वाढ खुंटू शकते. साधारणतः कोंबडीच्या एका अंड्यात सहा ग्राम प्रोटीन असतात. सोयाबीनच्या १०० ग्रॅम वजनात ४० ग्रॅम प्रोटीन असतात. परंतु आपण हे लक्षात घेतले पाहिजे की वनस्पतिजन्य प्रोटीन हे अंड्यातून येणार्या प्रोटीन इतके दर्जेदार नसतात. तरीही खरे पाहिले असता या बियांमध्ये प्रोटीनचे प्रमाण अत्यंत उत्कृष्ट आहे.
अन्नगत तंतु (dietary fibres)
चिया बिया या त्यांच्यातील डाएटरी फायबर्स साठी प्रसिद्ध आहेत. या बियांमध्ये दर शंभर ग्राम वजनाला ३४ ग्राम इतके तंतू असतात. हे तंतू आपल्या शरीराच्या पचनक्रियेत फार मदत करतात. या तंतूंमध्ये रक्तात साखर शोषून घेण्याची प्रक्रिया हळुवार होते. तसेच हे तंतू आपल्या आतड्यांमध्ये पाणी पकडून ठेवत असल्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठ म्हणजे कॉन्स्टिपेशन असल्यास ते आपल्याला फायदेकारक ठेवतात. तसेच हे तंतू इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोम नावाच्या आजारात उपयुक्त असतात.
फॅट
चिया बियांमध्ये फॅट म्हणजे स्निग्ध पदार्थांचे प्रमाण बर्यापैकी असते. तसेच या फॅट मध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड व APA नावाचे फॅटी एसिड असतात. ओमेगा थ्री फॅटी ऍसिड एक अँटिऑक्सिडंट आहे. हे आपल्याला कॅन्सर आणि हृदय विकारांपासून वाचतात.
लोह
लोह म्हणजे आयर्न आपल्या शरीरातील लाल रक्त पेशी मधील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. हिमोग्लोबिन कुठल्या खूप दिवसांपासून विविध अवयवांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. या बियांमध्ये लोहाचे चांगले प्रमाण असते.
कॅल्शियम
कॅल्शियम आपल्या शरीरातील हाडे मजबूत तयार करण्यासाठी आपल्याला आवश्यक असते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांची कमजोरी येऊन वारंवार फॅक्चर होऊ शकते. तसेच फ्रॅक्चर झाल्यास ते बरे करण्यास कॅल्शियमची आवश्यकता असते. या बियांमध्ये चांगल्या प्रमाणात कॅल्शियम असते.
पोटॅशियम
पोटॅशियम आपल्याला आपल्या शरीरातील रूदयाची व स्नायूंची गती राखण्यासाठी योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते. शरीरातील पोटॅशियम कमी झाल्यास किंवा अत्यंत जास्त झाल्यास त्यामुळे मृत्यु ओढवू शकतो. या बियांमध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात अस्तित्वात असते.
मॅग्नेशियम
चिया बिया मध्ये मॅग्नेशियम चे प्रमाण चांगले असते. मॅग्नेशियम चे आपल्या शरीरास विविध प्रकारे फायदे होतात.
आपण वरील चर्चेमध्ये चिया बिया मध्ये कोणती पोषक तत्वे असतात व त्यांचे काय काम असते हे जाणून घेतला. आता आपण चिया बियांचे शरीरास होणारे फायदे जाणून घेऊयात.
वरील सर्व पोषक तत्वं बरोबरच या बियांमध्ये काही प्रमाणात विटामिन सी आणि विटामिन बी असते.
चिया बियांचे आरोग्यास फायदे
चिया बिया आजपर्यंत अनेक क्लिनिकल रिसर्च मध्ये अभ्यासल्या गेल्या आहेत. त्यातून आलेली माहिती खालीलप्रमाणे आहे.
चिया बिया शरीराच्या वाढीसाठी
या बिया मध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असते हे आपण वरील चर्चेमध्ये बघितले आहे. शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन वाढीच्या वयात मिळाल्यास त्यामुळे आपल्या शरीराची वाढ चांगली होते. योग्य वाढीसाठी अन्नातील प्रोटीन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
चिया बिया ताकद साठी
माया संस्कृतीत वर्णन केल्याप्रमाणे ची
बिया या ताकदीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. या बियांमध्ये प्रथिने, कर्बोदके, फॅट्स आणि मिनरल चे प्रमाण चांगले आहे. हे शरीराची वाढ आणि ताकद येण्यासाठी महत्वाचे असते.
चिया बिया चांगल्या पचन संस्थेसाठी
आपल्याला आपल्या पचन संस्थेचे आरोग्य राखण्यासाठी डायट्री फायबर्स ची गरज असते. या बियांमध्ये हे तत्व भरपूर प्रमाणात असते. चिया बिया चांगले पाचक आरोग्य व बद्धकोष्ठ कमी करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
चिया बिया वजन कमी करण्यासाठी
वजन कमी करण्यासाठी उत्तम अशी जाहिरात करून या बियाण्यांची विक्री केली जाते. उंदरांवर अभ्यास केल्या असता यांनी वजन कमी होण्यास मदत होते. परंतु माणसांवर केलेल्या अभ्यासात असे कोणतेही तत्त्व पुढे आलेले नाही. या बियांचे रोज सेवन करणाऱ्यांचे वजन कमी झालेले आढलून आलेले नाही.
चिया बिया हृदय रोगासाठी
या बियांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असते. ओमेगा थ्री फॅटी ऍसिड चा अस्तित्वामुळे हृदयरोग कॅन्सरची शक्यता कमी होते. परंतु या बिया खाल्ल्याने फायदा होतो का हे बघण्यासाठी अजून अभ्यासाची गरज आहे.
चीया बिया रक्तातील साखर कमी करण्यासाठी
चांगल्या प्रमाणात अन्नगत तंतू असल्याने यामुळे रक्तात अन्नातील साखर शोसून घेण्याचा वेग मंदावातो. अन्नातील साखर शोधण्याचे प्रमाण कमी झाल्यास मधुमेह चांगल्या नियंत्रणात राहतो. परंतु या बियांमुळे खरोखर रक्तातील साखर कमी होते का हे जाणून घेण्यासाठी अधिक अभ्यासाची म्हणजे क्लिनिकल ट्रायल ची गरज आहे.
चिया बियांबद्दल आपण जाणून घेतले आहे. त्यात पोषक तत्वे आहेतच. त्यांचा फायदा देखील शरीराला होतो. परंतु तो किती प्रमाणात होतो हे जाणून घेण्यासाठी आजुन क्लिनिकल ट्रिअल्स ची गरज आहे.
चिया बिया कशा प्रकारे खाल्ल्या जातात?
या बिया खालील प्रकारे खाल्ल्या जाऊ शकतात.
- पाण्यात भिजवून.
- दुधात भिजवून.
- आईस क्रीम किंवा ज्यूस वर त्या पसरवून.
- ब्रेकफास्ट मध्ये मिसळून.