इन्फ्लुएन्झा किंवा फ्लू | Influenza in Marathi

इन्फ्लुएंझा किंवा फ्लू हा एक सामान्य संसर्गजन्य आजार आहे. हा आजार सामान्यतः सौम्य स्वरूपाचा असतो. परंतु या आजाराच्या काहीवेळा जगाच्या इतिहासात भारी नुकसान दाखवले आहे. आज आपण फ्लू विषयी जाणून घेऊया.

फ्लू या आजाराची साथ भारतात साधारणतः पावसाळ्यात व हिवाळ्यात दिसून येते. या आजारामुळे पाच वर्षाखालील बालकांना तसेच इतर काही आजार असणाऱ्या लोकांना गंभीर आजाराचा धोका असतो.

इन्फ्लुएंझा किंवा फ्लू चे कारण

इन्फ्लुएन्झा किंवा फ्लू हा एक संसर्गजन्य आजार आहे. हा आजार इन्फ्लूएंजा विषाणूमुळे होतो. या आजारांच्या विषाणूची वर्गीकरण ए, बी आणि सी या तीन प्रकारात केले जाते.

इन्फ्लुएन्झा ए हा विषाणू दर काही वर्षांनी त्याचे स्वरूप बदलत असतो. हा विषाणू अत्यंत वेगाने पसरतो आणि यामुळे महामारी होऊ शकते. या विषाणूचे त्याच्या जेनेटिक प्रकारांनुसार पुढील वर्गीकरण केले जाते.

इन्फ्लुएन्झा बी हा विषाणू सुद्धा दर काही वर्षांनी त्याचे स्वरूप बदलतो. या विषाणूमुळे तुमची साथ येते.

इन्फ्लुएंझा चा प्रसार

फ्लू हा एक संसर्गजन्य आजार आहे तो एका माणसापासून दुसऱ्या माणसा पर्यंत पसरू शकतो. त्याची एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरण्याची क्षमता प्रचंड आहे. हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसरीकडे हवेतून पसरतो.

फ्लू व्हायरस चा प्रसार खालील प्रकारे होतो.

  • इन्फ्लूएंजा व्हायरस चे इन्फेक्शन असलेली व्यक्ती बोलताना, शिंकताना, तसेच खोकताना हा विषाणू हवेत सोडते. इतर दुसरी व्यक्ती श्वास घेताना हा विषाणू त्या व्यक्तीच्या श्वासाद्वारे तिच्या शरीरात प्रवेश करतो.
  • तसेच हा विषाणू पृष्ठभागावर ही असू शकतो. अशा विषाणू बाधित पृष्ठभागाला हात लावण्यास आणि नंतर तो हात चेहऱ्याला किंवा डोळ्यांना लावल्यास, या विषाणूची इन्फेक्शन होऊ शकते.
  • हा विषाणू पृष्ठभागांवर काही मिनिटं जिवंत असू शकतो.
  • परंतु खोकल्यातून पडणाऱ्या कफामध्ये हा विषाणू सतरा दिवसांपर्यंत जिवंत असू शकतो.
  • हा विषाणू टेबल-खुर्ची तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे बटने यांच्याद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो.

इन्फ्लुएंझा ची लक्षणे काय?

इन्फ्लुएन्झा म्हणजे फ्लू या आजाराची लक्षणे साधारणतः खालील प्रकारची असतात.

  • हा आजार झालेल्या बहुतेक लोकांना आजार झाल्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत त्यांना असिम्प्टमाटिक कॅरियर असे म्हणतात. अशा व्यक्तीं मध्ये कोणतीही लक्षणे नसली तरीही ते इन्फेक्शन पसरू शकतात.
  • या आजारात ताप येऊ शकतो. ताप हा सुरुवातीला हलक्‍या स्वरूपाचा असतो परंतु तो नंतर मध्यम ते तीव्र स्वरूपाचा होऊ शकतो. बऱ्याच वेळा ताप हलक्‍या स्वरूपाचा येऊन तो बरा होऊन जातो.
  • काही जणांना तापा सोबत थंडी वाजणे ही समस्या असते.
  • या आजारात सर्दी होते. त्यात नाक वाहणे तसेच नाक बंद पडणे व शिंका येणे अशी लक्षणे दिसतात.
  • फ्लू या आजारात खोकला येऊ शकतो. हा खोकला कोरड्या स्वरूपाचा किंवा कफ असू शकतो.
  • घश्यात खवखवने आणि घसा दुखणे हीदेखील फ्लूची लक्षणे आहेत.
  • डोळ्यातून पाणी येणे तसेच डोळे लाल होणे फ्लू मुळे होऊ शकते.
  • फ्लूमुळे काहीजणांचे डोके दुखू शकते. साधारणतः ताप असताना ही डोकेदुखी वाढते.
  • याव्यतिरिक्त काहीजणांना हात पाय दुखणे, सांधेदुखी अशी लक्षणे दिसू शकतात.

काही बालकांमध्ये व इतर काही आजार असणाऱ्या लोकांना हा आजार गंभीर होऊ शकतो. गंभीर आजारामुळे प्राणही जाऊ शकतात. गंभीर आजाराची लक्षणे खालील प्रकारे आहेत.

  • धाप लागणे.
  • श्वास घ्यायला त्रास होणे.
  • श्वास घेताना छातीत दुखणे.
  • श्वास घेताना होणाऱ्या तास त्रासामुळे तसेच खोकल्यामुळे जेवण न करता येणे.
  • भूक न लागणे.
  • तीव्र स्वरुपाचा ताप.
  • शुद्ध हरपणे.

ही सर्व लक्षणे गंभीर फ्लू ची लक्षणे आहेत. या गंभीर स्वरूपाच्या लक्षणांनी रुग्णाचा जीव जाऊ शकतो.

वरील सर्व लक्षणे कोविड या आजारातही दिसून येतात.

इन्फ्लुएन्झा या आजाराचे निदान कसे केले जाते?

फ्लू हा आजार सामान्यतः सौम्य स्वरूपाचा असतो. त्यामुळे या आजाराचे निदान लक्षणांवरून असेच केले जाते. गंभीर स्वरूपाचा आजार असल्यास काही चाचण्या करण्याची गरज पडते. तसेच कोवीड या आजाराची लक्षणे सु सारखीच असल्यामुळे दोघांचे निदान करण्यासाठी टेस्ट ची गरज पडते.

  • फ्लू चे निदान करण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्ट वापरली जाऊ शकते.
  • तसेच फ्लू चे निदान करण्यासाठी rt-pcr टेस्ट करता येते.
  • विकसित देशांमध्ये या चाचण्या केल्या जातात. तसेच फ्लूची साथ पसरलेली असल्यास त्याचे निदान करण्यासाठी या चाचण्या वापरल्या जातात.
  • गंभीर स्वरूपाचा आजार असल्यास या टेस्ट सोबत इतरही चाचण्यांची गरज पडू शकते. छातीचा एक्स-रे तसेच रक्ताच्या चाचण्यांची गरज पडू शकते.

फ्लू ची ट्रीटमेंट

हा एक विषाणूजन्य सौम्य स्वरूपाचा आजार असल्यामुळे या आजाराचे उपचार सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट देऊन केले जातात. परंतु बालकांमध्ये तसेच इतर काही आजार असणाऱ्या लोकांमध्ये हा आजार सिरियस होत असल्यामुळे अशा लोकांवर लक्ष ठेवणे गरजेचे असते.

  • ताप आल्यास ताप कमी करणारे पॅरासिटॅमॉल किंवा इबुप्रोफेन चे औषध दिले जाते.
  • ताप आल्यास ओल्या कापडाने पुर्ण अंग पुसून घ्यावे.
  • सर्दी आणि खोकल्यासाठी गरम पाण्याची वाफ घ्यावी तसेच कोमट पाण्याने गुळण्या कराव्या.
  • सर्दी आणि खोकला ची ओव्हर द काउंटर औषधे वापरली जाऊ शकतात.
  • तापामुळे शरीरातील पाणी कमी होत असल्यामुळे या आजारात पाणी भरपूर प्या.
  • बालकांमध्ये तसेच इतर काही आजार असल्यास विषाणूला रोखणारी औषधे ओसेल्टामिविर वापरली जातात.
  • गंभीर स्वरूपाचा फ्लू असल्यास पेशंटला आयसीयूमध्ये ऍडमिट करून ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर द्वारे श्वासाची गरज पडू शकते.

फ्लू प्रतिबंध कसा करावा?

फ्लू चा प्रतिबंध करण्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. फ्लू हा एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत हवेद्वारे पसरतो. हवेद्वारे पसरणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी खालील प्रकारे वर्तन केल्यास मदत होऊ शकते.

  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
  • सर्दी, खोकला, ताप असलेल्या व्यक्ती पासून लांब रहावे.
  • मास्कचा वापर करावा.
  • साबणाच्या पाण्याने वेळोवेळी हात धुवावेत.
  • सनितीझर च योग्य प्रमाणात उपयोग करावा.
  • चेहरा व डोळ्यांना सारखा सारखा हात लावू नये.
  • टेबल-खुर्ची व अन्य पृष्ठभाग साबणाच्या पाण्याने स्वच्छ करून घ्यावेत.
  • आपल्याला लक्षणे असल्यास आपण घरीच राहवे म्हणजे इतरांना हा आजार होणार नाही.
  • इन्फ्लुएंझा ची लस उपलब्ध असून पाच वर्षाखालील बालकांना तसेच इतर काही आजार असणाऱ्या लोकांना द्यावी. या लस मुळे फ्लो होण्याची शक्यता कमी होते तसेच त्यामुळे मृत्यू होण्याची शक्यताही कमी होते.
  • बाळाला सहा महिन्यांपर्यंत फक्त स्तनपान द्यावे. स्तनपानामुळे बाळाला फ्लू तसेच डायरिया या आजारांपासून संरक्षण मिळू शकते.
  • थंड पदार्थ खाणे टाळावे.
  • थंडीत गरम कपड्यांचा व्यवस्थित वापर करावा.

फ्लू मुळे जास्त धोका कोणाला असतो?

सामान्यतः फ्लू हा एक साधारण आजार आहे. बहुतेक जणांना हा आजार सौम्य स्वरूपाचा होऊन आपोआपच बरा होतो. तरील खालील गटातील लोकांना या आजारामुळे गंभीर धोका उत्पन्न होऊ शकतो.

  • पाच वर्षे वयाखालील बालके.
  • पन्नास वर्षे वयावरील वृद्ध व्यक्ती.
  • मधुमेह आणि रक्तदाबाचा ताप त्रास होत असलेले लोकं.
  • इतर काही कारणांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी असणारे लोक.
  • स्टिरॉइड्सचे सेवन करणारे लोक.
  • धूम्रपान व मादक पदार्थांचे सेवन करणारे लोक.
  • तंबाखूचा वापर करणारे लोक.
  • योग्य आहार न घेणारे कुपोषित पालक व कुपोषित व्यक्ती.
  • एड्स चा आजार असणारी व्यक्ती.
  • कमी वजनाचे व लवकर जन्मलेल्या नवजात शिशु.
  • दमा, अस्तमा असणारे व श्वसनाचा आजार असणारे लोक.
  • हॉस्पिटल तसेच लॅब मध्ये काम करणारे लोक.

या सर्व गंभीर स्वरूपाचा आजार होण्याची शक्‍यता असते. या सर्व लोकांनी योग्य ती काळजी घेणे तसेच फ्लूची लस दरवर्षी घेणे महत्त्वाचे असते.



Leave a Reply