धनुर्वात (टिटॅनस)/ Tetanus in Marathi

टिटॅनस (tetanus) म्हणजे धनुर्वात हा जीवघेणा आजार आहे. जर कोणाला हा आजार झाला तर तो सगळ्यांसाठीच एक मोठे डोके दुखत होते. फिटनेस मुळे अत्यंत जिवघेणा मृत्यू होतो. या आजाराचे महत्त्वाचे असे गुणधर्म म्हणजे जबडा न उघडता येणे यास इंग्लिश मध्ये लोक जो असे म्हणतात. तसेच या आजारात आपल्या शरीरातील सर्व स्नायूंचे अनैच्छिक आकुंचन होते. त्यामुळे हात पाय व पाठीचे स्नायू कडाक होऊन शरीराचा आकार बदलतो.

धनुर्वाताचे कारण काय? (Cause of tetanus)

धनुर्वात हा एक संसर्गजन्य आजार आहे. हा आजार आपल्याला क्लोस्त्रिडियम टेटनी इन्फेक्शनमुळे होतो. हा एक जिवाणू आहे. हा जिवाणू मातीत राहतो. हा जिवाणू मातीत बीजाणू स्वरुपात राहू शकतो. हे बीजाणू दीर्घकाळापर्यंत माती जिवंत राहू शकतात. बीजाणू हे उष्णतेमुळे तसेच वातावरणातील बदलांमुळे सहज मरत नाहीत.

धनुर्वात कसा होतो? ( how does tetanus occur?

मातीत राहणारे क्लॉस्ट्रिदियम टिटॅनी बॅक्टेरियाचे जिवाणू किंवा बीजाणू आपल्या जखमां द्वारे आपल्या शरीरात गेल्या त्याचे इन्फेक्शन होऊन धनुर्वात होतो. हे बॅक्टेरियाचे जिवाणू आपल्याच जखामांमध्ये मध्ये वाढतात. ते वाढत असतांना एक विशिष्ट प्रकारचे विष तयार करतात. ह्या विषयाला टेटानोस्पस्मिन किंवा टिटॅनस टॉक्सीन सीन असे म्हणतात.

टिटॅनस टॉक्सिन हे आपल्या मज्जारज्जूवर परिणाम करणारे विष आहे. हे विष अत्यंत जहाल असते. या विषयाचा नेनो ग्राम पेक्षा लहान भाग आपल्या मृत्यूचे कारण बनू शकतो.

धनुर्वाताच्या संसर्गास कोणती जखम कारण ठरते? (Which injury does cause tetanus?)

धनुर्वात त्याचा संसर्ग कोणत्याही जखमेत होऊ शकतो. त्यास खालील प्रकारच्या जखमा मुख्यत्वे कारणीभूत असतात.

 • बाळाला जन्म देताना आईला होणारे जखमा.
 • बाळाची नाळ कापतांना बाळाला होणारी जखम.
 • आपल्याला कोणत्याही प्रकारची जखडून रोडवर झाल्यास.
 • पायात काटा गेल्यास त्यामुळे होणारी जखम.
 • ऑपरेशन करताना केली जाणारी जखम.
 • दात काढताना केली जाणारी जखम.
 • अन्य कोणत्याही कारणामुळे झालेली लहान व मोठी जखम.
 • धनुर्वात तास कारणीभूत ठरणारी जखम अत्यंत लहानही असू शकते.

धनुर्वात माणसापासून माणसाला होतो का? (Does tetanus spread from one person to another?)

नाही. धनुर्वाताचे जिवाणू मातीत राहतात. हा आजार आपल्याला जखमेत माती गेल्यामुळे होतो. हा आजार आपल्याला एका माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत पसरत नाही.

धनुर्वाताची लक्षणे काय? (What are symptoms of tetanus)

आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे धनुर्वाताचे आजारात आपल्या विविध स्नायूंचे अनैच्छिक आकुंचन होते. यामुळे आपल्या विविध अवयवांवर परिणाम होतो. शेवटी अन्न घेण्यास व श्वास घेण्यास बाधा येते. वेळीच उपचार न मिळाल्यास मृत्यू होते. 

धनुर्वाताची लक्षणेही खालील प्रकारची आहे.

 • सुरुवातीला रुग्णाचा जबडा घट्टपणे बंद होतो व तो उघडण्यास अडचण येते. जबड्याचे न उघडणे हे धनुर्वाताच्या आजारात एक सगळ्यात जास्त पाहिले जाणारे सुरुवातीचे लक्षण आहे. हा जबड्याचे स्नायू चा त्रास जबड्याचे स्नायू आकुंचन पावल्यामुळे होते.
 • याबरोबरच पेशंटला जबडा न उघडता येण्याबरोबरच जबड्याचे दुखणे ही वाढते.
 • रुग्णाला अन्न घेण्यास व पाणी पिण्यास त्रास होतो. नवजात बालकांमध्ये हे दूध न पिता येण्याचे पहिले लक्षण असते.
 • काही दिवसातच हातापायाचे स्नायू तसेच पाठीचे स्नायू आकुंचन पावतात.
 • सुरुवातीला येथे आकुंचन काही वेळासाठी मर्यादित असते.
 • परंतु काही दिवसांत हे आकुंचन होण्याचा अवधी वाढत जातो. 
 • पाठीचे स्नायू आकुंचित झाल्याने रुग्णाचे शरीर बाणाच्या आकाराचे होऊ शकते.
 • काही दिवसांतच आपल्या श्वासाचे स्नायू काम कारणे बंद करतात व श्वास न घेता आल्याने मृत्यू होतो.
 • स्नायूंचे हे आकुंचन फार जोरात होते. त्यामुळे शरीरातील हाडे तुटू शकतात.
 • या बरोबरच या आजारात रक्तदाब कमी होऊ शकतो व हृदयाचे ठोके वाढू शकतात.
 • लाळ व श्वसन नलिकेतील द्रवाचे प्रमाण वाढू शकते व गुदमरून मृत्यू होऊ शकतो.
 • स्नायूंचे हे आकुंचन पावण्याचे झटके जोरदार आवाजाने व तीव्र उजेडा ने वाढतात.
 • धनुर्वाताच्या आजारात ताप येऊ शकतो तसेच जास्त घाम येणे हे एक लक्षण असते.
 • ही सर्व लक्षणे असताना रुग्ण पूर्णपणे शुद्धीत असतो. या सर्व लक्षणांमुळे रुग्णांना अत्यंत दुखण्यातून जावे लागते व खूप त्रास होतो.
 • या रोगामुळे जणू काही रुग्ण आपल्या शरीरातच कैदी बनून राहतो.

धनुर्वाताचे निदान कसे केले जाते? ( How to diagnose tetanus?)

धनुर्वात हा आजार अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात येणारी लक्षणे बाकी कोणत्याही आजारात दिसत नाहीत. त्यामुळे त्याची लक्षणे असल्यास या आजाराचे निदान करणे अत्यंत सोपे आहे.

धनुर्वाताची लस घेतलेली नसलेला रुग्ण धनुर्वाताच्या लक्षनांसोबत सोबत येणे तसेच त्याला काही जखम झाल्याची इतिहास असणे हे निदान करण्यासाठी मुख्य कारण आहे.

धनुर्वाताचा चा इलाज कसा केला जातो? (What is treatment for tetanus)

धनुर्वाताचे चा इलाज करणे अतिशय कठीण आहे. धनुर्वाताचे इलाज वेळेस मिळाल्यास प्राण वाचू शकतात. हा इलाज करताना डॉक्टरांना आणि हॉस्पिटलच्या स्टाफला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते.

धनुर्वाताच्या इलाज खालील प्रकारे केला जातो.

 • धनुर्वाताच्या इलाजाची पहिली पायरी म्हणजे त्याचे कारण असलेल्या बॅक्टेरिया चा नायनाट करणे ही आहे. त्यासाठी अँटिबायोटिक्स वापर करावा लागतो. धनुर वातासाठी पेनिसिलीन तसेच टेत्रॅसिक्लिन आणि मेत्रोनिडझोल ही अँटिबायोटिक्स अत्यंत प्रभावी आहेत.
 • धनुर्वाताच्या बॅक्टेरिया चा नायनाट झाला तरी त्याचे विष आपल्या शरीरात पसरत राहते. या धनुर्वाताचे विशाचा नायनाट करणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी ह्युमन टिटॅनस इम्मुनोगलोबुलिन चा वापर केला जातो. जनावरांपासून मिळणारे अँटी टेटनस अंतिबोडी वापरल्या जाऊ शकतात. या इलाजामुळे  आपल्या रक्तातील धनुर्वाताच्या विशाचा नायनाट होतो. परंतु आपल्या मज्जारज्जू मध्ये शिरलेले विष मात्र या इलाजा मुळे नष्ट होत नाही. त्यामुळे या इलाज यानंतरही वरील सर्व लक्षणे नवीन मज्जारज्जू तयार होईपर्यंत असू शकतात.
 • आजार बरा होण्यास वेळ लागत असल्यामुळे सपोर्ट टीव्ही ट्रीटमेंट ही अत्यंत महत्त्वाची असते.
 • रुग्णाचा श्वासोश्वास या आजारात थांबत असल्यामुळे त्याला व्हेंटिलेटर ची गरज पडते. लक्षणे वाढण्या आधिच व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे तसेच पेशंटला इंटूबेट अत्यंत गरजेचे असते.
 • रुग्णाची थुंकी त्याच्या श्वसन नलिकेत अडकू शकत असल्यामुळे श्वसन नलिका ची स्वच्छता वारंवार करावी लागते.
 • रुग्ण एकाच जागी झोपून असल्यामुळे त्याच्या शरीरावर जखमा होऊ शकतात. रुग्णाची स्वच्छता तसेच त्याच्या शरीराची हालचाल करून घेणे हे एक महत्त्वाचे काम असते.
 • थोड्या देखील आवाजाने आणि उजेडात धनुर्वाताचे झटके असल्यामुळे या रुग्णांची काळजी अंधाऱ्या खोलीत व शांत खोलीत घ्यावी लागते.
 • या आजारात रुग्णाचा रक्तदाब तसेच हृदयाचे ठोके कमी जास्त होऊ शकतात. या सर्वांची सुद्धा काळजी घ्यावी लागते.
 • स्नायूंचे आकुंचन कमी करण्यासाठी रुग्णाला डाझेपाम सारखी औषधे अत्यंत मोठ्या डोसमध्ये द्यावे लागतात.

धनुर्वाताची गुंतागुंत काय? (What are complications of tetanus?)

धनुर्वात या आजारात खालील प्रकारची गुंतागुंत होऊ शकते.

 • जोरदार आकुंचन होऊन स्नायूंचे फाटणे.
 • स्नायूंच्या जोरदार आकुंचनामुळे शरीरातील हाडे तुटणे.
 • श्वासाचा त्रास होऊन न्यूमोनिया सारखा आजाराचे डोके वर काढने.
 • स्नायूंच्या जोरदार आकुंचनामुळे लघवीमध्ये स्नायूंमधील प्रथिने येणे.
 • रुग्ण एकाच जागी पडून राहिल्यामुळे त्वचेवर व्रण तयार होणे.
 • त्वचेवरील व्रण अन्य जिवाणू मुळे बाधित होऊन इन्फेक्शन होऊन रुगणाच्या रक्तात संसर्गाची बाधा होऊ शकते.
 • अन्न व पोषणाची नीट काळजी न घेतल्यास त्यामुळे रुग्णाचे कुपोषण होऊ शकते.
 • नवजात बालकांना भविष्यात सेरेब्रल पाल्सी हा मेंदूचा आजार होऊ शकतो.

धनुर्वात त्याचा प्रतिबंध कसा करावा? (How to prevent tetanus?)

धनुर्वात हा अत्यंत जीवघेणा आजार आहे. धनुर्वाताच्या आजार झाल्यास त्यास भरपूर ट्रीटमेंट लागत असल्यामुळे ते फार खर्चिक होऊ शकते तसेच जीव जाऊ शकतो.

त्यामुळे हा आजार होऊ न देणे हेच महत्त्वाचे असते. हा आजार होऊ न देण्यासाठी धनुर्वाताची लस उपलब्ध आहे. धनुर्वाताची लस धनुर्वाताचा आजार रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते.

ही लस भारतात अत्यंत स्वस्त दरात मिळते तसेच सरकारी दवाखान्यात ती फुकट मिळते. ही लस दीड महिने, अडीच महिने, साडेतीन महिने, दीड वर्ष पाच वर्ष आणि नंतर दर पाच वर्षांनी जन्मभर घेतली पाहिजे.
Leave a Reply