न्यूमोनिया | Pneumonia in marathi

न्यूमोनिया हा फुफूसाचा सांसर्गिक आजार आहे. यामध्ये फुफ्फुसांच्या आतील आलव्होली म्हणजे श्वसनसंस्थेच्या अगदी बारीक नलिका ज्या फूफूसामध्ये हस्तंतरणाचे  काम करतात. त्या न्युमोकोकस जीवाणूंच्या संसर्गास बळी पडतात .परिणामी फुप्फुसांमध्ये द्रव साठू लागतो. या द्रवामुले फूफूसाची कार्यक्षमता कमी होते. व त्यात कफसारखा द्रव जमून राहतो.

न्युरमोनिया मध्ये एक किंवा दोन्ही फुफ्फुसांना संसर्ग होऊ शकतो.

न्युमोनिया हे लक्षण आहे नेमके आजाराचे नाव नाही. पण डॉक्टर निमोनिया फारसा काळजी करण्यासारखा आजार असल्याचे सांगतात. या प्रचलित असलेली आणखी एक वैद्यकीय शब्द म्हणजे डबल न्यूमोनिया. म्हणजे दोन्ही फूफूसामध्ये संसर्ग असल्याचे लक्षण.

दोन्ही फुफ्फुसांमध्ये संसर्ग पोहोचणे ही सामान्य बाब आहे. न्युमोनियामध्ये फुफुसामध्ये जिवाणू ,विषाणू ,किंवा कवकांचा, संसर्ग होतो.

फूफूसाच्या वायुनलिकांमध्ये द्रव किंवा पु साठतो. यामुळे वायूनलिकांमधून पुरेसा ऑक्सिजन शरीरास मिळत नाही.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे व्यक्तीचा मृत्यू  ओढवतो.

 न्युमोनिया चे तीन प्रकार आहेत.

 •  विषाणूजन्य.
 •  जीवाणूजन्य.
 • आणि मायकोप्लाझमा 
 • किंवा कवक.
 • न्युंमोसिसटीस कॅरिणी नावाच्या कवकामूळे झालेल्या निमोनिया वेगळा आहे. या प्रकारचा न्युमोनिया सहसा एड्स रुग्णांना होतो.
 • क्षयाचे पर्यवसान कधीकधी निमोनिया मध्ये होते.

निरोगी व्यक्तीचा मृत्यू न्युमोनिया ने सहसा होत नाही. पण न्युमोनिया ने फूफूसात घर केले म्हणजे एड्स झालेल्या रुग्णाच्या जीवितास धोका उद्भवतो. सध्या उत्तम उपचार उपलब्ध असल्याने न्युमोनिया ने मरण पावणार्‍या व्यक्तीची संख्या कमी झाली आहे. तरीपण जगभराच्या मृत्यूचे न्युमोनिया हे सातवे कारण आहे .

न्यूमोनिया ची कारणे:

न्युमोनिया अनेक अंतर्भूत कारणांशी संबंधित आहे.

ज्यात जिवाणू,विषाणू, बुरशी आणि इतर सामान्य प्रकारचे संक्रमण आहेत.

शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यास किंवा तिचे संतुलन बिघडल्यास न्युमोनिया होतो.

श्वसन मार्गाच्या वरील बाजुस प्रथम संसर्ग होतो किंवा सिस्स्टेमिक म्हणजे सर्वसाधारण स्वरूपाचाहीं असू शकतो.

तोंड,घसा, किंवा नाकात असलेले जीवाणू अथवा विषाणू फूफूसांमध्ये गेल्यास होतो.

न्युमोनिया होण्याचे प्रमुख कारण म्हणजे जंतुदोष,

जंतुदोषामुळे वायू कोशाचा दाह होऊन सूज येते.

न्यूमोनिया कसा पसरतो?

 • व्यक्तीच्या माध्यमातून: न्यूमोनिया असलेली व्यक्ती सर्दी किंवा नाक आणि तोंड न झाकता शिकल्याने इतरांना संक्रमण होऊ शकते.
 • रक्ताद्वारे:
 • विशेषता जन्म आणि त्याच्यानंतर लगेच न्यूमोनिया रोगजनकांचा अधिक अभ्यास आवश्यक आहेत,

 म्हणून निवारण ही एक महत्त्वाची बाब आहे.

न्यूमोनिया चा उष्मायंन अवधी किती आहे?

न्युमोनिया चा उष्मायन अवधी दोन ते 5 दिवसांचा असतो. कमीत कमी तीन दिवसांमध्ये निमोनिया ची लक्षणे दिसू लागतात.

न्यूमोनियामध्ये कोणते अवयव बाधित होतात?

न्यूमोनियामध्ये फूफूस व फुफ्फुसांच्या आतील आलवोली म्हणजे श्वसनसंस्थेच्या अगदी बारीक नलिकांना बाधा होते.

न्यूमोनिया ची लक्षणे कोणती आहेत:

 • ताप.
 • थंडी वाजणे.
 •  खोकला येणे.
 •  श्वास जलद होणे किंवा श्वासाची गती वाढणे.
 • श्वास घेताना धाप लागणे.
 •  छातीत आणि पोटात दुखणे
 • शक्तिपात.
 •  उलटी होणे.
 • जिवाणूजन्य न्युमोनिया हळुवारपणे किंवा एकाएकी उत्पन्न होतो.

गंभीर न्युमोनिया रुग्णांमध्ये लक्षणे:

 • हुडहुडी भरणे.
 • तीव्र ताप.
 • छातीत दुखणे.
 •  अपुरा श्वास.
 • खोकल्यातून हिरवा, पिवळा, किंवा तपकिरी कफ.

मायकोप्लाझमा न्यूमोनिया ची लक्षणे:

मायकोप्लाझमा निमोनिया ची लक्षणे भिन आहेत. याला चालता-फिरता (वॉकिंग ) न्युमोनिया म्हणतात. त्याची लक्षणे विविध आहेत: एक सारखी लक्षणे नसणे हेच याचे वैशिष्ट्य आहे. घसा खवखवणे पासून झालेल्या लक्षणांचा प्रारंभ दीर्घकाळ चाललेल्या खोकल्या  मध्ये होतो. दम्याच्या रुग्णांमध्ये मायकोप्लाजमा निमोनिया आणि दीर्घकालीन स्वरूप घेतो.

लक्षणे:

 • अधून-मधून खोकल्याची मोठी उबळ.
 • पांढऱ्या रंगाचा कफ,कफाचे प्रमाण कमी असते.
 • हूडहुडी भरून थंडी वाजणे हे आजाराचे प्रारंभीचे लक्षण आहे.
 • मळमळ किंवा उलटी होणे.

न्युमोनिया चे निदान कसे केले जाते?

 • शारीरिक परीक्षण:
 • स्टेथोसकोप सह आपल्या फुप्फुसांना ऐकून असामान्य बबलिंग किंवा क्राकिंग ध्वनि तपासण्यासाठी.
 • रक्त तपासणी:
 • संक्रमण निश्चित करण्यासाठी.
 • चेस्ट एक्स-रे:
 • न्युमोनिया चे निदान आणि संक्रमणाचा विस्तार आणि स्थान निर्धारित करण्यासाठी.
 • पल्स ओकसिम्मेटरी:
 • आपल्या रक्तात ऑक्सिजन पातळी मोजण्यासाठी.
 • स्पूटम टेस्ट:
 • संसर्गाचे कारण तपासण्यासाठी.
 • सनगणित केलेले टोमोग्राफी स्कॅन:
 • आपल्या फुफुसाची विस्तृत प्रतिमा पाहण्यासाठी.
 • प्लुरल फ्लूड कल्चर:
 • संक्रमणाचा प्रकार शोधण्यासाठी.

न्युमोनिया वर उपचार कसे केले जातात?

न्युमोनिया चे उपचार प्रामुख्याने  न्युमोनिया चे प्रकार, त्याची तीव्रता आणि कारक, सूक्ष्म जीवांवर अवलंबून असते. उपचार मुख्यत्वे लक्षणांचे निवारण संसर्ग निराकरण आणि विकास टाळणे किंवा गुंतागुंत वाढणे टाळण्यावर केंद्रीत असतात.

न्युमोनिया वरील उपचारांमध्ये डॉक्टर, अँटिबायोटिक औषधे, ऑंटीव्हायरल औषधे, ऑक्सिजन थेरपी, यांचा वापर करतात. जिवाणू मुळे होणारा निमोनिया दोन ते चार आठवड्यांमध्ये बरा होतो. पण विषाणूमुळे होणारा निमोनिया बरा होण्यास अधिक कालावधी लागतो. पल्स ऑर्क्सीमीटर या यंत्राने रुग्णाच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासले जाते. त्यानुसार त्याला ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर ची गरज आहे का हे डॉक्टर निश्चित करतात.

(टीप: न्युमोनियाचा संशय असल्यास त्वरित तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्यांच्या मार्गदर्शनानुसार इलाज करावा.)
Leave a Reply