गोवर ची माहिती | Measles in marathi

गोवर हा एक संसर्गजन्य आजार आहे. या आजारास इंग्लिश मध्ये मिजल्स किंवा रुबीयोला असे म्हटले जाते. गोवर हा पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांमध्ये होणारा मृत्यूचा एक प्रमुख कारण आहे.

1960 सालापासून गोवरची लस जगाने स्वीकारले. या लहुच्या वापरापूर्वी गोवरने होणाऱ्या मृत्यूंची संख्या प्रचंड होती. साल 2000 ते 2018 च्या माहितीप्रमाणे गोवर मुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी होत आहे. लस्सी च्या प्रभावी परिणामामुळे व वापरामुळे गोवर होणाऱ्या बालकांची संख्या देखील कमी होत आहे.

असे असले तरी गोवर मुळे दीड लाख बालकांचा मृत्यू २०२० या साली झाला. अजूनही ज्या प्रदेशात लसीकरण पूर्णपणे केले जाते किंवा केले जात नाही अशा भागांमध्ये गोवर मुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या प्रचंड आहे.

गोवर कशामुळे होतो? | What is cause of measles?

गोवर हा एक संसर्गजन्य आजार आहे. गोवर हा आजार गोवर विषाणूच्या संसर्गामुळे होतो. गोवर हा एक विषाणूजन्य आजार आहे. गोवरची लस घेतलेली नसल्यास गोवर हा आजार होण्याची दाट शक्यता असते. 

गोवर कसा पसरतो? | How does measles spread?

गोवर हा संसर्गजन्य आजार हवा जन्य आहे. हा आजार हवेतून एका माणसापासून दुसरीकडे पसरू शकतो. हा आजार खालील मार्गांनी पसरतो.

 • गोवर संसर्ग असलेल्या माणसाच्या शिंकेत व खोकल्यातून गोवरचे विषाणू हवेत सोडले जातात. लस न घेतलेली व्यक्ती अशा संपर्कात आल्यास तिला गोवर होऊ शकतो.
 • गोवर हा आजार एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत त्वचेच्या स्पर्शानेही पसरू शकतो.
 • तसेच गोवर हा आजार गर्भावस्थेत तसेच जन्म होताना तसेच बाळांना दूध पाजताना आई पासून बालका पर्यंत पसरू शकतो.
 • ज्या पृष्ठभागांवर गोवर व्हायरस आहे अशा पुष्ट भागांना स्वच्छ केल्यास हा आजार होऊ शकतो.

गोवर हा आजार एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पसरण्यास अत्यंत प्रभावशाली आहे. गोवरची लस न घेतलेली व्यक्ती गोवर झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्या व्यक्तीस वर होण्याचे शक्यता नव्वद टक्के असते.

गोवर ची लक्षणे कोणती? | What are symptoms of measles?

गोवर ची लक्षणे सामान्य किंवा अत्यंत गंभीर असू शकतात. गोवर हा विविध लक्षणे दाखवतो. गोवर या आजारात खालील प्रकारे लक्षणे येतात.

 • सुरुवातीला गोवर मध्ये सर्दी-खोकल्यासारखे लक्षणे दिसतात. यात नाक वाहने, नाक बंद पडणे अशी लक्षणे दिसू शकतात. गोवर झालेल्या व्यक्तींना शिंका येतात किंवा कोरडा खोकला येऊ शकतो.
 • ताप हे गोवर या आजाराचे एक लक्षण आहे. सुरुवातीला हा ताप हलका असू शकतो दोन तीन दिवसात तो वाढवून मध्यम ते तीव्र स्वरूपाचा होऊ शकतो.
 • वरील प्रमाणे लक्षणं सोबत रुग्णाला भूक न लागणे, थकवा जाणवणे, हात पाय दुखणे अशी लक्षणे दिसू शकतात.
 • काही रुग्णांना या लक्षण सोबतचा डोकेदुखी ही देखील एक समस्या असते.
 • गोवरचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे त्यात त्वचेवर येणारी चट्टे. गोवर मध्ये येणारे चट्टे कानाच्या मागे सुरू होऊन कपाळावर व चेहर्‍यावर दिसू लागतात. हे चट्टे वाढत जाऊन छाती, पोट, पाठ व हातापायांवर पसरतात.
 • गोवर मुळे तोंडाच्या आत येणाऱ्या सगळ्यांना कोपलिक स्पोटस असे म्हटले जाते. कोकम एक्सपोर्ट चे वर्णन सगळ्यात आधी डॉक्टर कोपलीक यांनी १८९६ सली केले होते. हे चट्टे तोंडात दाढ च्या बाजूला येतात. हे चट्टे दिसण्यास अवघड असतात. परंतु हे सत्य दिसत असल्यास ते मिजल्स म्हणजे गोवऱ्या आजाराची शक्यता जास्त असल्याचे जाणवून देतात.

गोवर आजाराचे निदान कसे केले जाते? | How id measles diagnosed?

तुमच्या लक्षणांवरून आणि तुम्ही सांगितलेल्या माहितीवरून डॉक्टरांना तुम्हाला तपासून गोवर या आजाराचे निदान करता येते. गोवर मध्ये खालील तपासणी उपयुक्त ठरू शकतात.

 • गोवर अँटीबॉडीज: ही तपासणी तुमच्या रक्तापासून मिळवलेल्या सिरम मध्ये केली जाते. या तपासणीमध्ये तुमच्या रक्तातील गोवर विरुद्धच्या आयजीएम आणि आजिजी अँटीबॉडी चे अस्तित्व जाणून घेता येते. गोवर आयजीएम पहिल्या लक्षणांच्या एक ते दोन दिवसात रक्तात दिसू शकतात. तर गोवर आजाराने आजारी असताना घेतलेले सॅम्पल आणि चार आठवड्यानंतर घेतलेले सॅम्पल यांची तुलना केली असता आजिजी लेव्हलचे 4 पटींनी वाढणे गोवर हा आजार दाखवते.
 • गोवर वायरल कल्चर ही तपासणी सेंट्रल लॅब मध्ये केली जाते. या तपासणी द्वारे तुमच्या तोंड व नाकातून घेतलेले सॅम्पल तसेच रक्त आणि लघवी मध्ये गोवर या विषाणूची ओळख करता येते.
 • पोलिमरेज चैन रिएक्शन या तपासणी द्वारे गोवरच्या विषाणु ची ओळख केली जाऊ शकते. ही तपासणी सेंट्रल लॅब द्वारे नाक व तोंडातून मिळवलेल्या सॅम्पल व तसेच रक्त व लघवी च्या सॅम्पल वर केली जाते.

गोवर हा आजार भारतात दिसून येत असल्यामुळे या सर्व चाचण्यांची गरज सहसा भासत नाही. गोवरचे निदान तुमच्या लक्षणांवरून डॉक्टरांना करता येते.

गोवर वर काय उपचार केले जातात? | What is treatment for measles?

गोवर हा एक विषाणूजन्य आजार असून त्यासाठी औषध उपलब्ध नाही. तसेच गोवर हा एक विषाणूजन्य आजार असल्यामुळे अँटिबायोटिक्स त्याविरुद्ध काम करत नाही. परंतु अँटिबायोटिक्स गोवर मुळे होणाऱ्या सुपर इन्स्पेक्शन म्हणजे दुसऱ्या बॅक्टेरिया मुळे होणाऱ्या संसर्गाचे उपचार करण्यासाठी योग्य ठरू शकतात.

गोवर या आजारात खालील प्रकारे ट्रीटमेंट केली जाते.

 • गोवर या आजाराची उपचार अवेलेबल नसल्यामुळे यात सपोरटिव ट्रीटमेंट ही महत्त्वाची असते.
 • गोवर च्या पेशंटला ताप आल्यास त्यास पॅरासिटॅमॉल सारखी तापाचे औषध योग्य प्रमाणात दिले जावे.
 • गोवरच्या पेशंटला सर्दी खोकला असल्यास त्यास सर्दी खोकल्याची औषधे तसेच गरम पाण्याची वाफ घेणे उपयुक्त ठरते.
 • गोवर मुळे उलटी जुलाब होत असल्यास त्यास ओरल रिहाईद्रारींग सोल्युशन भरपूर प्रमाणात पाजावे.
 • गोवर मुळे न्यूमोनिया कानाचे इन्फेक्शन किंवा मेंदूचे इन्फेक्शन झालेले असल्यास त्याची ट्रीटमेंट अँटिबायोटिक्स ने करावी लागते.

गोवर मध्ये कोणती गुंतागुंत होते? | Complications of measles?

गोवर मध्ये गुंतागुंत म्हणजे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. ह्या कॉम्प्लिकेशन्स मुळे पेशंटचा जीव जाण्याचा धोका होऊ शकतो. गोवरचे कॉम्प्लिकेशन्स खालील प्रकारचे आहेत.

गोवरच्या तापामुळे तापाचा झटका येणाऱ्या बालकांना झटका येऊ शकतो म्हणजे आकडी येऊ शकतात.

गोवर च्या आजारात उलटी जुलाब शकतात. या उलटी जुलाबामुळे गोवर पेशंटच्या शरीरातील पाणी कमी होऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो.

गोवर आजारात कानाचे इन्फेक्‍शन होऊ शकते. हे कानाचे इन्फेक्शन गोवर विषाणूंमुळे किंवा अन्य बॅक्टेरिया मुळे होऊ शकते. या आजारात कानातून पू येणे तसेच कान दुखणे तसेच कमी ऐकायला येणे ही लक्षणे दिसू शकतात. वेळीच उपचार न केल्यास अशा पेशंटला कायमस्वरूपी बहिरेपणा येऊ शकतो.

गोवर च्या आजारात डोळ्यांवर परिणाम होऊन अंधत्व येऊ शकते. गोवर मुळे येणारे अंधत्व हा अंधत्वाचे कारण असल्यास एक प्रमुख कारण आहे. 

गोवर मुळे मेंदूचे इन्फेक्शन होऊन त्याला सूज येऊ शकते. याला इंग्रजीमध्ये इंकॅफेलाईट इस किंवा मेनिंगितीस असे म्हटले जाते. या आजारात पेशंटची शुद्ध हरपून तसेच झटके म्हणजे आकडी येणे व हात पाय लुळा पडणे अशी लक्षणे दिसू शकतात.

गोवर मुळे हृदयावर परिणाम होऊन मायोकर्डेतीस होऊ शकतो. अशा रुग्णाच्या रुदय फेल झाल्यामुळे मृत्यू होऊ शकतो.

एस पी पी इ हा गोव्हर मुळे होणारा एक खतरनाक आजार आहे यामुळे मृत्यू होतो.

गोवर चा प्रतिबंध कसा करावा? | How to prevent measles?

गोवर हा एक जीवघेणा आजार असून त्यावर उपचार उपलब्ध नसल्यामुळे तो होऊ न देणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. 

गोवर न होण्यासाठी गोवरची लस घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गोवरची लस गोवर चा प्रतिबंध करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. गेल्या पन्नास वर्षापासून गोवरची लस वापरात असून त्यामुळे प्रचंड प्रमाणात जगाचा फायदा झालेला आहे. तरीही गोवर लस बहुतेक भागात घेतली जात नाही. गोवरची लस घेणे लाखो बालकांना मिळण्यापासून वाचवू शकते.

लस न घेतलेली व्यक्ती गोवर झालेल्या माणसाच्या संपर्कात आल्यास त्याला ह्यूमन नोरमल इम्मुनोगलोबुळीन हे इंजेक्शन दिल्यास गोवर पासून वाचवले जाऊ शकते. परंतु हे इंजेक्शन बहुतेक वेळा उपलब्ध नसते व असल्यास खूप महाग असते. हे इंजेक्शन लस इतके प्रभावी नसते. त्याचा परिणाम थोड्या काळासाठी असतो.
Leave a Reply