टायफाईड आजाराची लक्षणे आणि उपचार | Typhoid in marathi

टायफाईड (Typhoid) हा एक कॉमन आजार आहे. भारतात दरवर्षी लाखो लोकांना टायफॉइड होतो. टायफाईड आजारास विषमज्वर तसेच ‘आंत्र ज्वर‘ असे देखील म्हणतात. साधारणतः पावसाळ्यात हा आजार जास्त करून पाहायला मिळतो. पावसाळ्यात होणाऱ्या विविध आजारांपैकी टायफाईड हा एक आजार आहे.

आज आपण टाईप ओडिया आजाराबद्दल चर्चा करूया.

टायफाईड आजाराचे कारण (Cause of typhoid)

टायफाईड हा आजार सालमोनेला टायफी या बॅक्टेरिया मुळे होणारा आजार आहे. सालमोनेला टायफी बॅक्टेरिया तसेच साल्मोनेला पराटायफी बॅक्टेरिया हे दूषित पाण्यात द्वारे पसरतात.

Typhoid fever

टायफाईड आजार कसा पसरतो?(How does it spread?)

टायफाईड हा एक संसर्गजन्य आजार आहे. टायफॉईडच्या संसर्गास कारणीभूत असणारा सालमोनेला टायफी बॅक्टेरिया दूषित पाणी आणि अन्नाद्वारे पसरतो. ज्याला सालमोनेला टायफी चे इन्फेक्शन झाले आहे तो मनुष्य आपल्या मला आणि मूत्रामध्ये सालमोनेला टायफी आजचा विसर्ग करू शकतो. असे मल आणि मूत्र पाण्यात किंवा अन्नात असल्यास खाणाऱ्याला टायफाईड होऊ शकतो.

शौचानंतर व्यवस्थित हात न घेतल्यास आणि अशा माणसाने अन्नाला स्पर्श केल्यास ते अन्न दूषित होते. ते अन्न खाणाऱ्याला टायफाईड चा हजार होऊ शकतो.

फक्त टाईम पॉइंट मे हजारी असलेलाच माणूस हजार पसरू शकतो असे नाही ही तर इन्फेक्शन असून आजाराची लक्षणे नसलेला ही मनुष्य हा हा आजार पसरू शकतो. 

टायफाईड आजाराचा उष्मायन अवधी (इंक्युबॅशन पिरियड) किती आहे?

सालमोनेला टायफी बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करण्यापासून पहिली लक्षणे येण्यास जो वेळ लागतो त्यास उष्मायन अवधी किंवा इंक्युबॅशन पिरियड असे म्हणतात.

टायफाईड आजाराचा इंक्युबॅशन पिरियड साधारण एक दिवस ते 30 दिवसापर्यंत असू शकतो. सामान्यतः टायफाईड आजाराचा इंक्युबॅशन पिरेड एक ते दहा दिवसांचा असतो.

टायफाईड आजाराची लक्षणे काय? (Symptoms of typhoid fever?)

टायफाईड हा एक सामान्य आजार असल्यामुळे आपल्या पैकी बहुतेकांना त्याची लक्षणे माहीत असतील. आपण त्याबद्दल अधिक खोलात माहिती घेऊया.

टायफड आजाराची लक्षणे सामान्यतः खालील प्रमाणे असतात:

  • ताप: टायफाईड मुळे येणारा ताप सुरुवातीला हलका असतो नंतर तो वाढू शकतो. सुरुवातीला हलका असणारा ताप हळूहळू मध्यम ते तीव्र स्वरूपाचा होऊ शकतो. दिवसातून दोन ते तीन वेळा हा ताप येऊ शकतो. 
  • थंडी वाजणे: टायफाईड मध्ये ताप असताना थंडी बाजू शकते तसेच हातापायाच्या थरथराट होऊ शकतो.
  • डोकेदुखी: डोकेदुखी हे टायफाईड आजाराचे एक सामान्य लक्षण आहे. सामान्यतः ही डोकेदुखी ताप असतांना वाढते.
  • मळमळणे: टायफाईड आजारात उलटी सारखे वाटणे व मळमळ होणे ही एक सामान्य समस्या आहे.
  • थकवा: वरील लक्षण सोबत टायफाईड आजारात थकल्यासारखे वाटते. हा थकवा ताप असल्यावर वाढतो व ताप उतरल्यावर थोडासा कमी होतो.
  • शौचास न होणे: टायफाईड आजारात शौचास न होणे ही समस्या असू शकते. त्याला बद्धकोष्ट किंवा कॉन्स्टिपेशन असे देखील म्हटले जाते.
  • डायरिया: टायफॉईडच्या काही पेशंटमध्ये डायरिया होऊ शकतो म्हणजेच लूज मोशन होऊ शकतात. त्याला हवं असे देखील म्हणतात.
  • भूक न लागणे: टायफाईड आजारात भूक लागत नाही आणि जेवणाची इच्छा होत नाही. जेवण न केल्यामुळे थकवा आजार जास्त वाढण्याची शक्यता असते.
  • पोट दुखी: टायफाईड मध्ये मुख्यत्वेकरून आतड्यांना सूज येत असल्यामुळे पोट दुखी हे एक सामान्य लक्षण आहे. टायफाईड आजाराची पोटदुखी हलक्‍या स्वरूपाची तसेच तीव्र स्वरूपाची असू शकते.
  • टायफॉईडच्या काही रुग्णांमध्ये सुरुवातीला सर्दी खोकला असे लक्षणे दिसू शकतात. या लक्षणांमुळे काहीवेळा टायफॉईडच्या निदानास वेळ लागू शकतो.
  • तसेच काही रुग्णांमध्ये या लक्षण सोबत सांधेदुखी आणि हाता पायाचे दुखणे असू शकते.
  • वरील लक्षणं सोबत आजार वाढत गेल्यास काही दिवसानंतर हा आजार बाकी अवयवांपर्यंत पसरून रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
Typhoid fever

टायफाईड चे निदान (diagnosis) कसे करतात? 

लक्षणांवरून तसेच पेशंटच्या तपासणीवरून टायफाईड चा अंदाज असल्यास खालील तपासण्या करण्याची गरज असते. तपासण्या टायफाईड चे निदान पक्के करण्यासाठी मदत करतात. एकदा का निदान झाले की टाईप होईल ची ट्रीटमेंट करून त्याला बरे करता येते.

टायफाईड चे निदान करण्यासाठी खालील तपासण्या यांची आवश्यकता असते:

  • ब्लड कल्चर टेस्ट: टायफाईड चे बॅक्टेरिया बघतात डिटेक्ट होऊ शकतात. त्यासाठी ब्लड कल्चर टेस्ट चा उपयोग होतो. ही एक रक्ताची तपासणी आहे. ती मायक्रोबायोलॉजी लॅब द्वारे केली जाते. त्यात रक्तात वाढणाऱ्या बॅक्टेरिया चा प्रकार तसेच ते कोणत्या अँटिबायोटिक ने नष्ट होतील त्या अँटिबायोटिक्स प्रकार माहिती केला जातो. याद्वारे तू कुणाची ट्रीटमेंट करण्यास एक दिशा मिळते.
  • यूरिन कल्चर टेस्ट: ही एक मूत्राची तपासणी आहे. टायफाईड रुग्णाच्या युरीन मध्ये टायफाईड ला कारण असलेले सालमोनेला टायफी बॅक्टेरिया असू शकतात. यूरिन कल्चर टेस्ट द्वारे हे बॅक्टेरिया डिटेक्ट केले जाऊ शकतात.
  • स्टूल कल्चर टेस्ट: टायफाईड रुग्णाच्या विष्ठेमध्ये ही सालमोनेला टायफी बॅक्टेरिया सोडले जातात. हे बॅक्टेरिया स्टूल कल्चर टेस्ट द्वारे ओळखले जाऊ शकतात.
  • टायफाईड आजारात वरील तपासण्या पॉझिटिव्ह येतीलच याची काही भरोसा नसतो. कधीकधी टेस्ट चुकीच्या येऊ शकतात त्यामुळे सर्व टेस्ट एकत्र केल्यास तसेच एकापेक्षा जास्त वेळा टेस्ट केल्यास आजाराचे निदान पक्के करण्यास मदत होते.
  • रेनल फंक्शन टेस्ट: या तपासणीला किडनी फंक्शन टेस्ट असेही म्हटले जाते. टायफाईड रुग्णात येऊ शकत नसल्यामुळे तसेच टायफाईड या आजारामुळे मूत्रपिंडावर डायरेक्टली परिणाम होऊ शकतो. या टेस्टमध्ये रक्तातील युरिया क्रिएटिन लेवल तपासली जाते. तसेच रक्तातील इलेक्ट्रोलाईट जसे की सोडियम पोटॅशियम ची तपासणी केली जाते.
  • लिवर फंक्शन टेस्ट: टायफाईड च्या आजारात काही पेशंटला लिव्हरला सूज येऊन म्हणजे यकृताला सूज येऊन कावीळ होण्याची शक्यता असते. अशा आजारात यकृताचे काम बिघडू शकते. ते आपल्याला लिवर फंक्शन टेस्ट या तपासणी द्वारे तपासता येते.
  • हिमोग्रम अथवा सीबीसी: या तपासणीमध्ये रक्तातील हिमोग्लोबिन लेबल तसेच तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी व प्लेटलेट्स ची संख्या मोजली जाते. ही तपासणी आजाराचे निदान करत नसली तरी पेशंटच्या मॉनिटरिंग साठी महत्त्वाची असते.
  • पोटाची सोनोग्राफी: टायफड या आजारात आतड्यांना सूज येते तसेच आतडी फुटून आजार वाढू शकतो. अशा आजारात पोटाची सोनोग्राफी केल्यास पेशंटचे मॉनिटरिंग आणि निदान करण्यास मदत होते.

टायफाईड या आजारात मुख्यत्वेकरून वरील तपासण्यांची गरज असते. तसेच टायफाईड चे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स असे असतात त्यांच्यासाठी अधिक वेगळ्या तपासण्यांची गरज पडू शकते.

टायफड आजाराचे उपचार (ट्रीटमेंट) काय? (Treatment for typhoid fever?)

वेळीच योग्य उपचार केल्यास टायफाईड हा एक पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. गंभीर नसलेल्या पेशंटची ट्रीटमेंट ऍडमिट न करता घरी देखील करता येते. तुमच्या डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने घरी ॲडमिट होऊन ट्रीटमेंट करता येते.

टायफड ची ट्रीटमेंट खालील प्रकारे आहे.

  • टायफाईड हा एक संसर्गजन्य आजार आहे त्याचा मुख्य इलाज म्हणजे अँटिबायोटिक्स आहेत. सिप्रॉफ्लॉक्सासीन/सिफिक्सीम ह्यासारखे अँटिबायोटिक ट्रीटमेंट मध्ये वापरले जातात. अँटिबायोटिक्स पूर्ण कोर्स करणे गरजेचे असते.
  • कधीकधी सालमोनेला टायफी बॅक्टेरिया रेझिस्टंट असतात म्हणजे ते साधारण अँटिबायोटिक ने पूर्णपणे नष्ट होत नाहीत. अशा परिस्थितीत उच्च अँटिबायोटिक्स वापरावे लागतात कारण साधारण एंटीबायोटिक ने पेशंट बरा होऊ शकत नाही. कोणते एंटीबायोटिक उपयोगी ठरतील हे साधारणपणे ब्लड कल्चर टेस्टमध्ये माहिती पडते.
  • याबरोबरच पेशंटला ताप येत असल्यास तापाचे औषध पॅरासिटॅमॉल मुलगी द्यावे लागते. या सर्व औषधींच्या योग्य व योग्य वापरामुळे पेशंट बरा होण्यास मदत होते.
  • तसेच रुग्णाची भूक कमी झाल्यामुळे पेशंटच्या अन्न व शरीरातील पाण्याची विशेष काळजी घ्यावी लागत. 
  • रुग्ण जास्त आजारी असल्यास त्याला ऍडमिट करून त्रिटमेंत द्यावी लागते.
  • बाकी सर्व औषधे लक्षणांत प्रमाणे द्यावी लागतात.

टायफाईड ची लस उपलब्ध आहे का?

टायफाईड हो लस द्वारे प्रतिबंध करता येण्यासारखा हा आजार आहे. टायफाईड ची लस उपलब्ध असून ती अत्यंत इफेक्टिव आहे.

टायफाईड चा प्रतिबंध (prevention of Typhoid)

टायफाईड हा एक दूषित पाणी द्वारे पसरणारा सामान्य आजार आहे. हा आजार भारत आणि दक्षिण आशिया खंडात मुख्यत्वेकरुन दिसून येतो. टायफाईड च्या केसेस मोठ्याप्रमाणात दिसण्याचे कारण म्हणजे पिण्यासाठी योग्य पाणी अवेलेबल नसणे हे आहे. तसेच दूषित अन्न खास करून रस्त्यावर विकले जाणारे अन्न खाल्ल्यामुळे हा आजार होऊ शकतो.

टायफाईड चा प्रतिबंध म्हणजे प्रिव्हेन्शन कसे करावे याबद्दल आपण खोलात माहिती घेऊया. टायफाईड साठी चे प्रतिबंधात्मक उपाय खालीलप्रमाणे आहेत.

  • हात धुणे: शौचानंतर तसेच जेवणाआधी साबणाने स्वच्छ हात धुणे गरजेचे असते. टायफाईड असलेल्या व्यक्तीच्या शोच्यात टायफड चे जंतू असतात. असे जंतू शौचानंतर हातांवर येतात. जे शौचानंतर हात न धुतल्यास व अन्नाला स्पर्श केल्यास ते अन्न आत जाऊ शकतात. असे दूषित अन्न खाणाऱ्यांना टायफाईड होऊ शकतो. तसेच टायफॉईड ची जंतू तुमच्या हातावरही असू शकतात. जेवणाआधी हात न दुखल्यास त्याचा संसर्ग तुम्हाला होऊ शकतो.
  • स्वच्छ पाणी: आपल्या देशात अजूनही उघड्यावर शौच विसर्जन केले जाते. असे स्वच्छ पाण्यात मिसळल्यास ते पाणी दूषित करते. असे पाणी पिण्यात आल्यास त्याद्वारे टायफाईड ची बाधा होऊ शकते. पावसाळ्यात खास करून हा धोका जास्त असतो. पिण्याचे पाणी उकळून थंड करून प्यावे. तसेच अधिक काळजी म्हणून पाण्यात क्लोरीन ड्रॉप वापर करणे हा एक उपाय असू शकतो. पाहण्यासाठी वापरले जाणारे फिल्टर आणि आरो फिल्टर टायफाईड रोखण्यासाठी मदतीचे ठरतात.
  • स्वच्छ अन्न: वरील परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे दूषित अन्न मधून टायफाईड बसण्याचा धोका असू शकतो. नेहमी स्वच्छ पद्धतीने घरी बनवलेले अन्नाचे सेवन करावे. असे केल्यास टायफॉईडच्या प्रसारास प्रतिबंध लागू शकतो. स्वच्छ अन्न खाल्ल्याने तुम्ही टायफाईड पासून वाचू शकतात. उघड्यावर विसर्जित केलेल्या शौच्या वर बसणाऱ्या माश्या जर अन्नावर बसल्या तर त्या अन्न दूषित करू शकतात. त्यामुळे उघड्यावर असणारे अन्न खाणे टाळावे.
  • टायफाईड ची लस: टायफाईड ची लस उपलब्ध असून ती सहा महिने वरील वयाच्या सर्व व्यक्तींना घेता येते. ही लस टायफाईड चा प्रतिबंध करण्यास अत्यंत प्रभावशाली आहे. टायफाईड कसा प्रतिबंध करण्यास वेगवेगळ्या टायफाईड लस अवेलेबल आहेत. त्यापैकी भारतात इंजेक्शनद्वारे दिलेली लस वापरली जाते. तोंडाने घेता येण्यासारखी लसही अवेलेबल आहे. परंतु ती सध्या भारतात उपलब्ध नाही.
  • शौच व  शौचलायाचा वापर करणे हे टायफॉईडच्या प्रसारास थांबवण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.

वरील सर्व माहिती तुमच्या शंकांचे निरसन झाले असेल अशी अपेक्षा करतो. तरीही तुमच्या अजून काही शंका असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून आम्हाला त्या कळवावे अशी विनंती.




Leave a Reply