टीबी किंवा क्षयरोग (tuberculosis in Marathi)

मित्रांनो ट्यूबर्क्युलोसिस किंवा क्षयरोग ज्यास आपण टीबी असे सुद्धा म्हणतो हा एक फार घातक आजार आहे. हा आजार मुख्यत्वे करून गरीब देशांमध्ये जसे की आफ्रिकेत आणि दक्षिण आशियातील देश जसे की भारत येथे फार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. आज आपण ट्यूबर्क्युलोसिस या आजाराबद्दल आपणाला माहिती देऊ या.

टीबी किंवा क्षयरोग या आजाराचे कारण (Cause of Tuberculosis)

हजारो वर्षांपासून टीबी किंवा क्षयरोग या आजाराचे वर्णन आपल्याला आपल्या साहित्यात मिळते. क्षयरोगाची वर्णन आयुर्वेदातही केलेली आहे. क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्यूबर्क्युलोसिस (Mycobacterium tuberculosis) नावाच्या बॅक्टेरिया च्या संसर्गामुळे होतो. क्षयरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे.

टीबी किंवा क्षय रोग कसा पसरतो? (Mode of spread of tuberculosis)

मित्रांनो टीबी किंवा क्षयरोग हवेद्वारे पसरतो. क्षयरोग झालेली व्यक्ती बोलते शिंगते खोकते तेव्हा क्षयरोगाचे बॅक्टेरिया हवेत सोडले जातात. एखादी क्षयरोग नसलेली व्यक्ती जेव्हा अशी हवा श्वासावाटे आत घेते तेव्हा त्या व्यक्तीला क्षयरोगाचा संसर्ग होऊ शकतो.

थुंकने आणि शिंकताना, खोकताना तोंडासमोर आहात युवा रुमाल न धरणे या सवयीमुळे या आजाराच्या प्रसारास मदत होते.

क्षयरोगाचा उष्मायन अवधी (incubation period) किती आहे?

प्रथमतः इन्फेक्शन झाल्यापासून पहिले लक्षण येण्याच्या कालावधीला इंक्युबॅशन पिरियड असे म्हणतात. क्षय रोगासाठी हा होती काही दिवसांपासून काही वर्षांपर्यंत असू शकतो. 

तुम्हाला क्षयरोगाचे इन्फेक्शन झाल्यास आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यास क्षयरोग तुमच्या शरीरात सुप्तावस्थेत राहू शकतो. त्याला संधी मिळताच तो आजाराच्या रुपाने डोके वर काढू शकतो. ही प्रक्रिया काही दिवसांपासून काही वर्षांपर्यंतचा वेळ घेऊ शकते.

क्षयरोगात कोणते अवयव बाधित होतात? (Which organs are affected in tuberculosis)

क्षयरोगात शरीरातील कोणतेही अवयव बाधित होऊ शकतात बाधित होऊ शकतात. क्षयरोगाची बाधा छातीतील फुप्फुस पोटातील आतडे तसेच डोक्यातील मेंदूला देखील होऊ शकते. गर्भपिशवीच्या क्षयरोग यामुळे वंधत्व सारखे आजार येऊ शकतात. पाठीच्या कण्याला ही क्षयरोगाची बाधा होऊन पाठीचा कणा क्षीण होऊ शकतो. तसेच हाडांना ही क्षयरोगाची बाधा होऊ शकते.

क्षयरोगाची लक्षणे कोणती? (Symptoms of tuberculosis)

क्षयरोग आणि खास करून फुप्फुसात होणारा क्षय रोग हा एक फार कॉमनली होणारा आजार आहे. या आजाराची लक्षणे खालील पैकी असू शकतात:

 • भूक न लागणे हे क्षयरोगाचे एक प्रमुख लक्षण आहे. भूक न लागल्यामुळे रुग्ण अन्न खात नसल्यामुळे त्याचे वजन कमी होणे अशी समस्या उद्भवू शकते.
 • वजन कमी होणे हे क्षयरोगाचे दुसरे लक्षण आहे. वजन कमी होण्याचे कारण म्हणजे शरीरातील आजाराची अस्तित्व तसेच आजारामुळे भूक न लागणे हे असू शकते.
 • लहान बाळांमध्ये क्षयरोग भूक न लागणे सोबतच वजन व उंची वाढवण्यात दिसू शकतो.
 • शरीर रोगात तापही येतो हा ताप जनरली हलक्या स्वरूपाचा असतो. खास करून संध्याकाळी येणारा ताप जो घाम येऊन ताप उतरतो रात्री.
 • क्षयरोगाचा खोकला येतो जॉकी 15 दिवसांपेक्षा जास्त असू शकतो. हा खोकला कोरडा असतो किंवा कफ पडू शकतो.
 • क्षयरोग जास्त प्रमाणात झाला असल्यास श्वास घ्यायला त्रास होतो व छातीतील फुप्फुस जास्त प्रमाणात खराब झाल्याने मृत्यू ओढवू शकते.
 • मेंदूचा क्षयरोग झाले असल्यास चिडचिडपणा, झोप न लागणे, शुद्ध हरवणे तसेच हातापायांची कमजोरी अर्धांगवायु अशी लक्षणे येऊ शकतात.
 • पाठीच्या कण्याचा क्षयरोग झाल्यास पाठ दुखणे कंबर दुखणे तसेच पायांची कमजोरी अशी लक्षणे दिसू शकतात.
 • मेंदूचा क्षयरोग हे एक गंभीर आजाराचे लक्षण आहे. मेंदूच्या क्षय रोग यामुळे काही दिवसातच मृत्यूही होऊ शकतो.

क्षयरोगाचे निदान (diagnosis) कसे केले जाते?

वरील सर्व लक्षणे आणि पेशंटच्या तपासणीवरून क्षयरोगाची संशय असल्यास खालील प्रमाणे तपासण्या कराव्या लागतात.

 • छातीचा एक्स-रे (Chest X ray): क्षयरोगाचे निदान करण्यासाठी ही एक महत्त्वाची तपासणी आहे. या तपासणी द्वारे आपल्याला छातीतील फुप्फुस आणि त्यांना क्षयरोगाची बाधा झाली आहे का हे तपासता येते. कधीकधी क्षयरोगाचा छातीत पाणी जमा होते. हे आपल्याला छातीच्या एक्सरेद्वारे समजू शकते.
 • थुंकी ची तपासणी (Sputum examination): छातीचा क्षयरोग असल्यास थुंकी च्या तपासणी द्वारे ओळखला जाऊ शकतो. येथे थुंकी चा अर्थ लाळ असा होत नाही. थुंकी च्या तपासणीत खोकल्यातून पडणार्‍या कफ ची आवश्यकता असते. आत्तापासून मिथुन की डायरेक्ट मायक्रोस्कॉपी खाली किंवा स्पुटम कल्चर द्वारे तपासली जाते.
 • स्पूटम कल्चर (Sputum culture): ह्या तपासणी द्वारे थंकितील मायकोबॅक्टेरियम ट्यूबर्क्युलोसिस ओळखले जाऊ शकतात. तसेच मायकोबॅक्टेरियम ट्यूबर्क्युलोसिस बॅक्टेरिया ची संख्या मोजली जाऊ शकते. परंतु या तपासणीचे परिणाम येण्यास चार आठवड्यांचा टाइम लागू शकतो.
 • जीन एक्सपर्ट (Genexpert MTB): ही तपासणी आधुनिक असून याद्वारे काही मिनिटात अचूकपणे मायकोबॅक्टेरियम ट्यूबर्क्युलोसिस बॅक्टेरिया ओळखले जाऊ शकतात. ही तपासणी आज-काल एक गोल्ड स्टॅंडर्ड म्हणून वापरली जाते.
 • ट्यूबर्क्युलीन स्किन सेंसितिविटी टेस्ट (Mantoux test): या तपासणीला मांटू टेस्ट असे देखील म्हटले जाते. ही तपासणी एक स्क्रीनिंग टेस्ट म्हणून वापरले जाते. ही तपासणी पंधरा वर्षापेक्षा लहान वयाच्या लोकांमध्ये किंवा बाळांमध्ये महत्त्वाची असते.
 • इ एस आर (ESR): ही एक रक्ताची तपासणी असून एक सपोर्ट टेस्ट आहे. यात वेस्ट द्वारे ट्यूबर्क्युलोसिस या एकाच आजाराचे निदान होत नाही. परंतु या टेस्टद्वारे आजार ओळखण्यास मदत होते.
 • तसेच अन्य रक्ताच्या चाचण्या जसे की हिमोग्राम रेनल फंक्शन टेस्ट आणि लिवर फंक्शन टेस्ट या टेस्ट करावे लागतात. ट्रीटमेंट चालू करण्याआधी पेशंटचे निवड आणि किडनी नॉर्मल आहे का हे तपासणे गरजेचे असते.
 • काही केसेस मध्ये या सर्व तपासणी नॉर्मल येऊ शकतात आणि तरीही ट्यूबर्क्युलोसिस शंका असल्यास छातीचा सिटीस्कॅन उपयोगी ठरू शकतो.

क्षयरोगाचे उपचार कसे केले जातात? (Treatment of Tuberculosis)

क्षयरोग हा राष्ट्रीय आरोग्य प्रोग्राम मध्ये येत असल्यामुळे क्षय रोगाचे उपचार सरकार फुकट करते. क्षयरोगाची सर्व औषधे सरकारी दवाखान्यात फुकट मिळतात. वेळीच उपचार केल्यास क्षयरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे.

फक्त गंभीर आजारात हॉस्पिटल ला ॲडमिट होण्याची गरज पडते बाकी सर्व पेशंट घरी औषधे घेऊन बरे होऊ शकतात.

क्षयरोगाचा इलाज करण्यात अँटिबायोटिक उपयोगी पडतात. Isoniazid, pyizinamide, rifampicin आणि Ethambutol ही क्षयरोगासाठी वापरली जाणारी औषधे आहे. क्षयरोगाची ट्रीटमेंट म्हणजे औषधे सहा ते नऊ महिने पर्यंत चालू शकतात. काही गंभीर प्रकारच्या क्षय रोगात यापेक्षा जास्त महिन्यांच्या ट्रीटमेंटची गरज होऊ शकते.

क्षयरोगाचा संशय असल्यास त्वरित तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्यांच्या मार्गदर्शनानुसार इलाज घ्यावा.
Leave a Reply