एम एम आर ची लस 1 त्रिगुणी लस आहे. ती मिजल्स मॉम्स आणि रूबेला म्हणजे गोवर, गालगुंड आणि रूबेला या आजारांच्या प्रतिबंधासाठी दिले जाते.
गोवर हा एक संसर्गजन्य आजार आहे. गोवर हा एक हवा जन्य आजार आहे. गोवर हा आजार आजारी माणसापासून हवेतून इतरांना पोहोचतो. या आजारात ताप, शरीरावर चट्टे येणे, जुलाब अशी लक्षणे असतात. या आजारामुळे बालकांमध्ये जीव जाण्याचा धोका असतो.
गालगुंड हादेखील गोव्यात प्रमाणे हवेतून पसरणारा आजार आहे. या आजारात ताप तसेच लाड बनवणाऱ्या ग्रंथींना येणारी सूज आणि गिळायला त्रास होणे अशी लक्षणे दिसतात. लाड बनवणाऱ्या ग्रंथींना येणाऱ्या सूज मुळे या आजारात गाल सुजल्यासारखे दिसतात. त्यामुळे या आजाराला गालगुंड असे देखील म्हणतात. हा आजार बालकांमध्ये जीवघेणा होऊ शकतो.
रूबेला या आजाराची जर्मन गोवर असे देखील म्हटले जाते. हा आजार गोवर आणि गालगुंड याप्रमाणे हवेतून पसरणारा आजार आहे. हा आजार जीवघेणा नाही. या आजारात ताप आणि शरीरावर चट्टे येणे असे लक्षणं दिसतात. परंतु हा आजार गर्भवती स्त्रीला झाल्यास होणाऱ्या बालकाला जन्मजात व्यंग होऊ शकते.
एम एम आर ची लस दिल्यास या तीनही आजारांचे प्रतिबंध होऊ शकते.
एम एम आर ची लस कशी उपलब्ध आहे?
एम एम आर ची लस सिंगल डोअर किंवा मल्टी डोस व्हायल मध्ये उपलब्ध असते. एका बाटलीत पावडर आणि एका बाटलीत त्याला विरघळण्यासाठी आवश्यक द्रावण मिळतो.
एम एम आर ची लस कशी स्टोअर केली जाते?
एम एम आर ची लस 2 ते 8 डिग्री सेल्सिअस ला उत्पादन करणाऱ्या कंपनीने सांगितल्याप्रमाणे फ्रीजमध्ये स्टोअर केली जाते.
उत्पादन स्थानापासून ही लस बापरे पर्यंत 2 ते 8 डिग्री सेल्सिअस ला ठेवली गेली पाहिजे. अन्यथा ही लस खराब होऊन वाया जाऊ शकतो.
एन एम आर ची लस कशी दिली जाते?
एम एम आर ची लस देण्याआधी विरघळण्यासाठी आवश्यक असलेले द्रावण एका निर्जंतुक सिरिंज मध्ये घेतले जाते. नंतर हे द्रावण एम एम आर लस च्या पावडर सोबत एकत्र केले जाते. पूर्णपणे एकत्र झाल्या नंतर ते द्रावण परत एका निर्जंतुक सिरिंज मध्ये घेतले जाते.
नंतर पूर्णपणे निर्जंतुक प्रक्रियेद्वारे हे इंजेक्शनद्वारे पेशंटला टोचले जाते. हे इंजेक्शन तुमचे खाली किंवा स्नायूंमध्ये दिले जाते.
ह्या लसचा चा डोस ०.५ मिली आहे. ही लस विरघळल्यानंतर लगेच अर्ध्या तासात वापरून टाकायची असते.
एम एम आर इंजेक्शन कोणत्या वयाला दिले जाते?
एम एम आर एक राष्ट्रीय लसीकरण मोहिमेतील लस आहे. ही लस नऊ महिने वयाला दिली जाते तसेच या लसीचे पुढील डोस पंधरा महिने आणि पाच वर्षाला दिले जातात.
एम एम आर लस चे साईड इफेक्ट काय?
एम एम आर लस चे साईड इफेक्ट खालील प्रमाणे आहेत:
- एम आर लस दिल्यानंतर काही बालकांना ताप येऊ शकतो. हा ताप हलका ते मध्यम स्वरूपाचा असू शकतो. परंतु हा एक साधारण साईड-इफेक्ट आहे. हा ताप तापाच्या औषधाने घरच्या घरीच कमी केला जाऊ शकतो.
- काही बालकांना गोवन प्रमाणे अंगावर चट्टे येऊ शकतात. ते देखील आपोआप काही दिवसात कमी होतात.
- अंग दुखी व सांधे दुखी हा साईड इफेक्ट काही बाळांना होऊ शकतो. परंतु तो हलक्या स्वरूपाचा असतो व काही दिवसात आपोआप कमी होतो.
- इंजेक्शनच्या जागी दुखणे व सूज काही बाळांना येऊ शकते. दोन ते तीन दिवसात ते दुखणे आपोआप कमी होते.
- काही बाळांना ही लस दिल्यानंतर दोन-तीन दिवसांसाठी डोकेदुखी होऊ शकते परंतु ती आपोआप कमी होते.
- काही बाळं ही लस घेतल्यानंतर भूक न लागणे व चिडचिड पणा अशी लक्षणे दाखवतात. तीन दिवसांसाठी ही लक्षणे राहू शकतात.
- क्वचित काही बाळांना ही लस घेतल्यानंतर ऍलर्जिक रिऍक्शन घेऊ शकते. काही बाळांना नाही ऍलर्जिक रिऍक्शन जास्त प्रमाणात घेऊन जीव जाण्याचा धोका होऊ शकतो. परंतु हे प्रमाण पण फार क्वचित आहे. लाखो बाळांना डोस दिल्यानंतर एखाद्या बाळाला अशी ऍलर्जिक रिऍक्शन येऊ शकत होते.
एम एम आर ची लस कोणी घेऊ नये?
एम एम आर लस गोवर गालगुंड आणि रूबेला या आजारांना प्रतिबंध करणारी व्यवस्था आहे. ही लस खालील लोकांनी घेऊन नये.
- ज्या लोकांना या लॉस मधील घटकांची अलर्जी आहे त्यांनी ही लस घेणे टाळावे.
- ज्या लोकांना पहिल्या रोजच्या वेळी मोठी ऍलर्जिक रिऍक्शन आली होती त्यांनी ही लस घेणे टाळावे.
- गर्भवती स्त्रियांनी ही लस घेणे टाळावे.
- ज्या लोकांची लोक प्रतिकारशक्ती एड्स सारख्या आजाराने खूपच कमी झालेली असून तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यातला एडस आहे त्यांनी ही लस घेणे टाळावे.
एकंदरीत या लसीमुळे होणाऱ्या साईड-इफेक्ट पेक्षा होणारे फायदे भरपूर आहेत. त्यामुळे ही एक महत्वाची लस आहे.
एम एम आर ची लस कोणत्या ब्रँडची मिळते?
एमएमआर ची लस वेगवेगळ्या कंपन्यांद्वारे बनवली जाते.
जी एस के कंपनीची प्रिओरिक्स (priorix) आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ट्रेसिवाक (tresivac) हे भारतातील प्रमुख ब्रँड्स आहेत.